

कोल्हापूर विभागात ओल्या दुष्काळामुळे ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
esakal
Sugarcane Crop : कुंडलिक पाटील : कोल्हापूर विभागात गतवर्षी दोन कोटी पाच लाख टन ऊस गाळप झाले होते. यंदा अतिवृष्टी, पूर परिस्थिती व सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे नदीकाठी व डोंगरी भागात, असे एकूण ऊस उत्पादनात ३५ ते ४० लाख टनांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकारांच्यातून वर्तवली जात आहे. तसेच काढणीला आलेल्या खरिपातील सोयाबीन आणि भात पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम परिसरात परतीच्या पावसामुळे भात कापणीच्या कामांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. काढणीच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.