Kolhapur : शरद पवार की हसन मुश्रीफ? राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत कमालीची अस्वस्थता, पक्ष फुटीमुळं मोठा धक्का

कोल्हापूर महागरपालिकेतील (Kolhapur Municipal Corporation) राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Hasan Mushrif Vs Sharad Pawar
Hasan Mushrif Vs Sharad Pawaresakal
Updated on: 
Summary

मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजात बरीच मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती नगरसेवकांचे एक वर्तुळ तयार झाले होते.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर कोल्हापूर महागरपालिकेतील (Kolhapur Municipal Corporation) राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Hasan Mushrif Vs Sharad Pawar
Radhanagari : हसन मुश्रीफांचा 'दोस्त' कोणाला साथ देणार? साहेब की दादा, 'केपीं'च्या राजकीय भूमिकेकडं लक्ष्य

या विचित्र मानसिकतेतून बाहेर पडून कोणाचे नेतृत्व मानायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सध्यातरी या सर्वांनी शांतपणे बसणेच पसंत केले आहे.

पक्षफुटीमुळे नेत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, नेत्यांसाठी, पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना फुटल्यामुळे तीव्र दु:ख झाले आहे. अशीच अवस्था कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांची झाली आहे.

Hasan Mushrif Vs Sharad Pawar
NCP Crisis : राष्ट्रवादीत आधे इधर, आधे उधर; 'या' आमदाराच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

एकीकडे शरद पवारांशी निष्ठा तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्यावर श्रद्धा असताना राष्ट्रवादी फुटल्यामुळे या माजी नगरसेवकांना प्रचंड धक्का बसला आहे. जे काही घडले ते अकल्पित घडले असल्याने त्यावर भाष्य करणे किंवा कोणा एकाची बाजू घेणे कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक टाळले आहे किंवा ते मतप्रदर्शन करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजात बरीच मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती नगरसेवकांचे एक वर्तुळ तयार झाले होते. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न आठ-दहा माजी नगरसेवक गेल्या वर्षभरापासून करत आहेत. त्यांना मुश्रीफ यांचे पक्ष पाठबळ आहे.

Hasan Mushrif Vs Sharad Pawar
Kagal Politics : समरजित घाटगे भाजपची साथ सोडणार? मुश्रीफांच्या मंत्रिपदाने नाराज; आज जाहीर करणार भूमिका

परंतु, आता भाजपसोबत जाण्याचा निर्णय माजी नगरसेवकांना रुचलेला नाही. जयंती नाला जसा प्रदूषित झाला आहे, तसे गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणही प्रदूषित झाले असल्यामुळे महापालिकेची निवडणूक लढवावी की नको, असा विचार निष्ठेचे तसेच वैचारिक राजकारण करणाऱ्यांकडून केला जाऊ लागलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif Kolhapur political news
Gokul Dairy Election 2026 Sees 12 Former Directors and 11 New Faces Three Former Presidents Contesting in Karveer
Hasan Mushrif Issues Warning to Dissatisfied Leaders Says Those Who Join Opposition Will Be Defeated in Elections
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
Marathi News Esakal
www.esakal.com