esakal | Kolhapur : महापालिकेवर फौजदारी गुन्हा का दाखल करु नये? आपचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : महापालिकेवर फौजदारी गुन्हा का दाखल करु नये? आपचा सवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ताराबाई पार्कातील गटारीतून मैलामिश्रीत सांडपाणी का सोडले, अशी विचारणा आम आदमी पक्षातर्फे उपायुक्त उपायुक्त निखिल मोरे यांना आज करण्यात आली. ताराबाई पार्क येथील भवानी अपार्टमेंट, सुर्वे कॉलनी येथे पावसाचे पाणी वाहून नेणारी गटार आहे. मागील काही महिन्यांपासून या गटारीतून वारंवार मैलामिश्रीत सांडपाणी सोडले जाते. आज सकाळीही मैलामिश्रीत पाणी सोडले असल्याचे स्थानिक नागरिकांनी दाखवून दिल्यानंतर 'आप'चे युवाध्यक्ष उत्तम पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी सांडपाणी बाटलीत भरून महापालिकेत धाव घेतली.

मैलामिश्रित सांडपाणी सोडल्याबद्दल महापालिकेवर फौजदारी का करू नये, अशी विचारणा 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली. यावर मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून फोनवर माहिती घेतली. कावळा नाका येथून फेस्टिव्ह लॉन येथे येणारे सांडपाणी तुंबल्यास ते घाटगे-पाटील यांच्या बंगल्यासमोरील चेंबर मार्गे सुर्वे कॉलनीत सोडले जाते, अशी माहिती दिली. मैलामिश्रीत सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते, असे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा: शेट्टींना मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी निमंत्रण; आज दुपारी बैठक

यावर मोरे यांनी संबंधित चेंबर साफ करून घेऊ, असे सांगितले. फक्त चेंबर साफ करून उपयोग नाही, यावर कायमस्वरूपी उपाय काढा, अशी मागणी केली. जर पुन्हा मैलामिश्रीत सांडपाणी गटारीतून वाहिले तर फौजदारी तर दाखल करूच, सोबत अधिकाऱ्यांना अंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. संबंधित पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश उपायुक्त यांनी डॉ. पावरा यांना दिले. यावेळी सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, मयूर भोसले, विशाल वठारे, प्रथमेश सूर्यवंशी, बसवराज हदीमनी, राकेश व्हटकर उपस्थित होते.

loading image
go to top