
ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये विविध राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. उद्योगांसाठीही ऊर्जा म्हणून आजही लाकडाचा वापर केला जातो. घर बांधणीमध्येही लाकूड वापरले जाते. या सर्व कारणांमुळे वृक्षतोड केली जाते. झाडांच्या संरक्षणासाठी कायदेही आहेत. मात्र, कायद्यातील पळवाटांचा लाभ उठवत सर्रास वृक्ष तोडले जातात. आता याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.