
Kolhapur Cooperative Politics : कोल्हापुरातल्या राजकारणातले काही वस्ताद आहेत. हसन मुश्रीफ त्यातलचं एक मोठं नाव. पण आता हेच मुश्रीफ मोठा निर्णय घेणार आहेत. आणि त्यामागे महाडिकांची खेळी आहे का? असा संशय व्यक्त केला जातोय. आता हा नेमका मुद्दा काय?
हसन मुश्रीफ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. पण वाशिमच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा देत मुश्रीफांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्याला धक्का देणारा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आता हा निर्णय काय असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.