

Satej Patil Jayant Patil Maharashtra Political News
esakal
Satej patil Political Statement : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण असतानाच काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी यावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील हे शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन पुढे जाणारे नेते असून ते महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेणार नाहीत, असा ठाम विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.