Mahadevi Elephant
esakal
कोल्हापूर
Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय
Nandani Math Mahadevi : महादेवी हत्तीण मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीने निर्णय घेण्यासंदर्भातचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व मठाकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर दिला होता.
Kolhapur Mahadevi Elephant Decision : नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी हत्तीण मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीने निर्णय घेण्यासंदर्भातचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व मठाकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर दिला होता. याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मंगळवारी (ता.१६) प्राप्त झाला आहे. त्यानंतर नांदणी मठाचे महास्वामी यांच्याकडून याबाबतच्या अर्जावर कोल्हापूर येथे बुधवारी स्वाक्षऱ्या पूर्ण केल्या आहेत. गुरुवारी (ता.१८) उच्चस्तरीय समितीकडे नांदणी मठ, राज्य शासन व वनताराकडून अर्ज दाखल होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे अॅड. मनोज पाटील यांनी दिली.

