
Woman Ends Life
ESAKAL
Kolhapur Woman Killed : दीड वर्षापूर्वी विवाह झालेल्या अर्पिता विठ्ठल वायदंडे (वय २३, रा. देवाळे, ता. करवीर) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अर्पिता यांनी आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.