‘शक्तिपीठ’ला जमीन देणार नाही!, सांगलीत शेतकरी आक्रमक
esakal
कोल्हापूर
Shaktipith Highway : जीव गेला तरी चालेल पण ‘शक्तिपीठ’ला जमीन देणार नाही!, सांगलीत शेतकरी आक्रमक
Farmers Protest : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘शक्तिपीठ’ प्रकल्पासाठी जमीन संपादनास जोरदार विरोध केला आहे. “जीव गेला तरी चालेल पण जमीन देणार नाही” असा निर्धार करत शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन तीव्र झाले आहे.
Farmers Protest Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी गेल्या दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. सावळज (ता. तासगाव) येथे आज मोजणीसाठी अधिकारी पुन्हा येणार होते. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जीव देऊ, पण शक्तिपीठ महामार्गाला जमीन देणार नाही, असे पुन्हा ठणकावून सांगितल्याने मोजणी अधिकाऱ्यांना परतावे लागले.

