
-नंदिनी नरेवाडी
कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याचा संदेश मोबाईलवर येतो. मात्र, प्रत्यक्षात बँक खात्यात पैसेच जमा झाले नसल्याचे बँकेत गेल्यावर समोर येते. अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याकडे गेल्यानंतर संबंधित महिलांची पडताळणी केल्यानंतर त्यांच्याकडून अर्ज भरण्यात चूक झाल्याचे निदर्शनास आले. चूक एकाची मात्र हक्काच्या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ महिलांवर आली आहे.