

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल परिसरात पिवळा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
esakal
Yellow Rain in Kagal : कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच आज पुणे-बंगळूर महामार्गावर कागल लक्ष्मी टेकडी आणि कागल-निढोरी रस्त्यावर पाऊस सुरू असतानाच पाणी पिवळ्या रंगाचे वाहताना पाहायला मिळाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत कुतुहल निर्माण झाले. अनेकांनी या पिवळ्या पावसाचे मोबाईलवर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले.