"कमकुवत राष्ट्राचे कोणी ऐकत नाही. न्याय व सत्यतेची प्रतिष्ठा राखण्यासाठी ते आवश्यक आहे. आर्थिक युद्धामुळे अमेरिकेच्या एका डॉलरमागे भारताला ८७ रुपये ९० पैसे मोजावे लागत आहेत."
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक दहशतवाद सुरू असून, अमेरिकेची गुलामगिरी किती दिवस सहन करायची, असा प्रश्न योगगुरू रामदेवबाबा (Yoga Guru Ramdev Baba) यांनी येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला. पतंजली विद्यापीठ व पतंजली योग समितीतर्फे येथील महात्मा गांधी मैदानावर आयोजित महासंमेलन व कुंकुमार्चन कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.