
कोल्हापूर : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस दल रात्रंदिवस कार्यरत आहेच. सायबर गुन्ह्यांतून कोणाचीही आर्थिक फसवणूक होणार नाही, यासाठी सायबर गुन्हेगारीवर लक्ष दिले जाईल. महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये तातडीची मदत देण्यासह निर्भय पथकांच्या मदतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न केले जातील, असा विश्वास नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला.