

कागल उरुसाला जाताना समोरून येणाऱ्या टँकरला तरूणाची जोरदार धडक
esakal
Kolhapur Bike Collides with Tanker : दुधाच्या टँकरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात १९ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. अजय प्रकाश वायदंडे (रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल) असे या तरुणाचे नाव आहे. कागल-निढोरी राज्यमार्गावर वड्डवाडी येथे आज दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. टँकरचालक रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला आहे.