Kolhapur : सासनेनगरातील तरुणाच्या खूनप्रकरणी आणखी एकास अटक; पाच संशयितांवर गुन्हा दाखल असून, एक जण पसार

Kolhapur Crime : कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने घाटगेने साथीदारांच्या मदतीने दळवीला जरगनगरातील बारमधून उचलून नेले. पुईखडी, शिरोली येथे त्याला बेदम मारहाण करून जखमी अवस्थेत नाना पाटीलनगरात फेकून दिले होते.
Police making another arrest in the Sasnenagar youth murder case as one accused remains absconding.
Police making another arrest in the Sasnenagar youth murder case as one accused remains absconding.Sakal
Updated on

कोल्हापूर : कर्जाच्या बहाण्याने ६५ हजारांची फसवणूक केल्याच्या रागातून पाच जणांनी केलेल्या मारहाणीत प्रकाश जयवंत दळवी (वय ४२, रा. सासनेनगर) यांचा मृत्यू झाला होता. मारहाणीत जखमी झालेल्या दळवी यांना नाना पाटीलनगरातील फूटपाथवर फेकून पसार झालेल्या ओंकार अनिल पाटील (२८, रा. देऊळ गल्ली, शिरोली दुमाला) याला आज करवीर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल असून, एक जण पसार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com