सव्वा लाख सातारकर नोकरीच्या प्रतीक्षेत

सव्वा लाख सातारकर नोकरीच्या प्रतीक्षेत

सातारा : जिल्हा सेवा योजन व कौशल्य विकास कार्यालयात जिल्ह्यातील एक लाख 34 हजार 974 बेरोजगार युवकांनी नोकरी मिळावी, या अपेक्षेने नोंदणी केली आहे. जानेवारी 2020 मध्ये एक हजार तीन युवकांची नोंदणी झाली आहे. नोंदणी केलेल्यांपैकी गेल्या पाच वर्षांत केवळ 37 हजार 761 उमेदवारांना नोकरी मिळाली आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातून तब्बल आठ हजार 400 युवकांनी प्रशिक्षण घेऊन व्यवसाय, उद्योगाची कास धरल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सेवा योजन व कौशल्य विकास कार्यालयात जानेवारी 2020अखेरपर्यंत तब्बल एक लाख 34 हजार 974 सुशिक्षित बेरोजगार युवकांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 97 हजार 759 पुरुष, तर 36 हजार 215 स्त्री उमेदवारांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यात 1003 सुशिक्षित बेरोजगार युवकांची नोकरीसाठी नोंदणी झाली आहे. यामध्ये 804 पुरुष व 199 स्त्रियांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत 37 हजार 761 बेरोजगारांना नोकरी मिळाली आहे.

यामध्ये गेल्या वर्षी 2019 मध्ये सात हजार 618 जणांना नोकरी मिळाली आहे. 2016 मध्ये सर्वाधिक 12 हजार 558 जणांना नोकरी मिळाली आहे. 2015 मध्ये सर्वांत कमी 3016 जणांना नोकरी उपलब्ध झाली आहे. नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने किंवा नोकरी मिळत नसल्याने जिल्ह्यातील आठ हजार 401 बेरोजगार उमेदवारांनी कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेऊन व्यवसाय उद्योग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाेकरीसाठी नोंदणी करणारे

दहावी
 
35974
बारावी 37771
डिप्लोमा 2780
एज्युकेशन 1955
 आयटीआय इतर  2038
 आयटीआय  3950
 ऍप्रेंटिस एक वर्ष 1587
 ऍप्रेंटिस तीन वर्षे 16
पदवीधर कला शाखा 9913
 
 विज्ञान शाखा  2679
वाणिज्य शाखा  9701
अभियांत्रिकी 2990
 
वैद्यकीय  82
कृषी  89
विधी  40
एज्युकेशन 1856
मॅनेजमेंट  32
 इतर  752
इतर  0
इतर  0


हेही वाचा -  साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

पाच वर्षांत नोकरी मिळालेले उमेदवारांची सांख्यिक माहिती 

2015 3016 
2016  12558
2017  7010
2018  7559
2019  7618 
एकूण  37761 


हेही वाचा - महाराष्ट्रातील 16 गावांत पेटले पाणी

जरुर वाचा - दोन लाख कुटुंबांना रोजगाराची संधी

कौशल्य केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले उमेदवार 

2015-16 1033 
2016-17 2793 
2017-18 1343
2018-19 1410
2019-20 1822 
एकूण उमेदवार 8401 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com