

Sangli shirala leopard wildlife attack breaking news
esakal
Leopard Drags Child Into Field : बिऊर (ता. शिराळा) येथील अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला अनेक वेळा फोन लावला तरीही कुणीही फोन उचलला नाही. त्यामुळे संतप्त जमावाने वन विभागाचे कार्यालय फोडून ‘बिबट्यांना मारायची परवानगी द्या. आम्हाला पैसे नकोत मुलगा परत द्या’, अशी मागणी केली.