Belgaum : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची एकीची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 महाराष्ट्र एकीकरण समिती

Belgaum : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची एकीची घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : आपल्यातील मतभेदांमुळे आपण 2008 सालापासून वेगळे झालो होतो. पण यानंतर एक दिलाने, जिद्दीने मतभेदाची उजळणी न करता एकत्रित येऊन काम करूया. यानंतर तालुक्यात दोन नाही तर एकच समिती असेल. या समितीच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती, आपल्यावरील अन्याय अत्याचार दूर करण्याबरोबर सीमाप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकत्र लढूया. अशा भावना समिती नेत्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: ST Strike : सरकारची विरोधकांशी चर्चा; तोडग्याची शक्यता!

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवारी झाली. ओरियटल शाळेजवळ असलेल्या तुकाराम महाराज सभागृहात ही सभा झाली. यावेळी तालुका समितीची एकी झाल्याची घोषणा करण्यात आली. बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अद्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, युवा आघाडी अद्यक्ष संतोश मंडलिक, मनोज पावशे, सुरेश डुकरे, एस. एन. चौगले, म्हातृ झगरुचे, पिराजी मुचण्डिकर, तानाजी पाटील आदी व्यासपीठावर होते.

हेही वाचा: 'इफ्फी'मध्ये यंदा 'OTT'वरील चित्रपटांचाही समावेश; अनुराग ठाकूर यांची घोषणा

दोन्ही गट एकत्र आल्यामुळे आपली शक्ती वाढली आहे. अजूनही काही कार्यकर्ते समितीत येण्यास तयार आहेत. त्याच्यासाठी एक कार्यक्रम आखा. आपली ही शक्ती येणाऱ्या महामेळाव्यातून दाखवून देऊया. तसेच यानंतर नव्या जोमाने व निष्ठने आपण लडूया. अशा भावना नेते व कार्यकत्यांनी वेक्त केल्या. यामुळे संयुक्त महाराष्ट्रच्या घोषणा देण्यात आल्या.

loading image
go to top