Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

Devendra Fadnavis and Vishwajeet Kadam Travel Together : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार विश्वजित कदम यांनी मुंबई ते पुणे असा एकत्र प्रवास केला. या सहप्रवासामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Mumbai to Pune political journey

Mumbai to Pune political journey

esakal

Updated on

कडेगाव (सांगली) : भारती विद्यापीठासह विविध संस्थात्मक कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेहमीच संवादी राहणाऱ्या आमदार विश्‍वजित कदम यांनी काल मुंबई ते पुणे असा सहप्रवास केला. आमदार कदम काल मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे कामानिमित्त गेले होते. भेटीनंतर ते पुण्याकडे निघणार होते. त्याचवेळी मुख्यमंत्रीही आषाढी वारी दर्शनासाठी पुण्यास येणार होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोबतच येण्यास सांगितल्यानंतर हा योग जुळून (Devendra Fadnavis Vishwajeet Kadam meeting) आला. या सहज भेटीची राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com