esakal | माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नीला कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: दिवंगत माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी आणि लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी यांना कोरोना झाल्याचे आज (ता.२७) निदान झाले. श्रीमती अंगडी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिलेली आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी प्रकृती स्थिर आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून, क्वारंटाईन झाले आहे, असे अंगडी यांनी कळविले आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये जाहीर निवडणुकीची सांगता होत असताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. या दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना लक्षणे जाणविले. यामुळे ते क्वारंटाईन झाले. तसेच उपसभापती आनंद मामनी यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यासाठी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नेत्यांसह संपर्कातील व्यक्तींना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अंगडी यांनी चाचणी करून घेतली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सतेज पाटीलांचा सत्तारूढ संचालकांना सल्ला

माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पोटनिवडणूक जाहीर झाली. पोटनिवडणूक चुरशीची ठरली. भाजप, कॉंग्रेससह महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांत चुरशीची लढत होती. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी जोर लावला. विविध सभा, कार्यक्रम आणि बैठका घेतल्या. त्यात काही संदर्भात कोरोना नियमावली पाळण्यात आली नाही. यातून कोरोनाचा शिरकाव वाढला. मंत्री, नेत्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. यात आता अंगडींचा समावेश आहे.

Edited By- Archana Banage

loading image