esakal | एन्काउंटरप्रकरणातील पोलिसांना ब्रेव मेन पुरस्कार देणार
sakal

बोलून बातमी शोधा

Balan Group Donated Bicyles To Students

इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमानंतर मनिंदरजित सिंग बिट्टा यांनी 
पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सिंग यांनी विविध सामाजिक विषयांवर परखड मत व्यक्त केले.

एन्काउंटरप्रकरणातील पोलिसांना ब्रेव मेन पुरस्कार देणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : स्वातंत्र्य लढाईच्या इतिहासात अनेकांनी बहुमूल्य असे योगदान दिले असून, प्रत्येकाचे योगदान अतुलनीय आहे. इतिहासाची पानांची चेष्ठा केली नाही पाहिजे. ते राष्ट्रभक्‍त असून, माझा त्यांच्या कार्याला सलाम आहे. राजकीय वाद हे तात्त्विक असतात, तरीही ज्यांनी देशाच्या लढाईत बलिदान दिले आहे, त्यांच्यावर चिखलफेक करून राजकीय स्वार्थ कोणी साधू नये,' असे मत राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय दहशतवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष मनिंदरजित सिंग बिट्टा यांनी व्यक्‍त केले.

अवश्य वाचा - हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने येथे आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, पुनीत बालन, जान्हवी धारिवाल, सारंग पाटील आदी उपस्थित होते. इंद्राणी बालन फाउंडेशन, पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल यांच्या वतीने मार्च महिन्यात पुण्यामध्ये हुतात्मा जवानांचे कुटुंबीय, युद्धात जखमी झालेल्या जवानांना मदत करणार असल्याचे श्री. बिट्टा यांनी सांगितले.
 
श्री. बिट्टा यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत विचारले असता ते म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, गुरू गोविंदसिंग ही आपली प्रेरणास्थाने आहेत. महात्मा गांधी, सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू त्याचबरोबर अनेकांनी देशासाठी योगदान दिले आहे. ज्यांनी इतिहासात योगदान दिले, त्यांना आपण विसरून चालणार नाही. त्यांच्या कार्याचा सन्मान करावा. कोणी त्यांच्या कार्यावर आक्षेप घेऊ नये. असे करणे म्हणजे इतिहासाची पाने बदनाम करण्याचा प्रकार आहे.'' 

हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरप्रकरणी ते म्हणाले, ""पोलिसांनी केले ते योग्यच होते. मी स्वत:हून त्यांच्या सत्कारासाठी हैदराबादला जाणार आहे. आरोपी पळून जात असतील तर पोलिसांनी काय हाताची घडी घालून बघत उभे राहावे का? त्यांनी त्यांचे कर्तव्य केले आहे. या पोलिसांना मी भेटणार असून, त्यांना "ब्रेव मेन' पुरस्कार देणार आहे.'' 

जरुर वाचा : ​...अन्यथा मी पुन्हा येईन : शिवेंद्रसिंहराजे

सध्या राजकीय बाबींपासून थोडा दूर आहे. मी ज्यावेळी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, त्या वेळी अशोक चव्हाण उपाध्यक्ष होते. महाराष्ट्राने मला चांगली साथ दिली. शरद पवार आणि माझेही चांगले संबंध आहेत. त्यात कोणता खंड पडलेला नाही. वेणूगोपाल यांना मी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणले, असेही श्री. बिट्टा म्हणाले.