बेळगाव ; जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांवर मराठी शिक्षकांची छाप 

मिलिंद देसाई
Friday, 4 September 2020


बेळगाव शैक्षणिक जिल्हात मराठी माध्यमांच्या शिक्षकांबरोबरच मराठी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारावर मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी छाप पाडली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील 34 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 6 मराठी माध्यमांच्या शिक्षकांचा समावेश असून शनिवारी सकाळी 10 वाजता सेंट अँथोनी हायस्कुलमध्ये फक्‍त 100 जणांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. 

बेळगाव शैक्षणिक जिल्हात मराठी माध्यमांच्या शिक्षकांबरोबरच मराठी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दरवर्षी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देताना फक्‍त तीन ते चार शिक्षकांनाच जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतो. त्यामुळे अनेक शिक्षकांचे कार्य मोठे असूनही शिक्षक पुरस्कारांपासून वंचीत राहीले आहे. त्यामुळे दरवर्षीच मराठी शिक्षकांमधून नाराजी व्यक्‍त होत असते. यावेळी शिक्षण खात्याकडून जाहीर करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये खानापूर येथील मराठा मंडळ संस्थेच्या ताराराणी हायस्कुलचे मुख्याध्यापक विलास. बी. देसाई, अनगोळ येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक सहाच्या सह शिक्षिका जयश्री मनोहर पाटील, बसुर्ते येथील सरकारी मराठी शाळेतील रेखा रेणके व खानापूर येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील आर. बी. बांदीवडेकर व भालके केएच येथील मराठी शाळेतील सह शिक्षक सुर्याजी पाटील, नंदगड येथील कन्या हायस्कुलचे मुख्याध्यापक भालचंद्र पाटील यांचा समावेश आहे. यासह एम. एस. गुरुवैनवर, महमद हनिफ मुनवळ्ळी, ए. एच. पुजार, रेणुका बंती, एन. एस. कब्बुर, के. एन. मुचंडी, एम. एम. कामत, प्रिती कामकर, जी. बी. सोगलन्नवर, संकल्प गुरुबाळ, बी. ए. लिंगाडे, आर. एम. हादीमनी, राजेश्‍वरी चिक्‍कमठ, दिपा गुरनगौडर, व्हि. एस. मनप्पन्नवर, गुरुनाथ पत्तार, लुर्दा अँथोनी लुईस, शांता वग्गर, बी. बी. हाळोल्ली, भारती कुडबाळ, सिध्दप्प काशेन्नवर, शिवानंद मिकली, जी. बी. पाटील, मल्लनगौड पाटील,एस. व्ही. पत्तार, मंजुनाथ कळसण्णवर, जी. एस. सुर्यवंशी, सी. बी. कोणी यांचा समावेश आहे. 

हे पण वाचा - हृदय हेलावणारी घटना; अंत्यसंस्कारानंतरही मृतदेहाची हेळसांड! स्थिती पाहून संतापाची लाट

 

सेंट ऍथोंनी हायस्कुलच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमावेळी शिक्षण खात्याने शिक्षक दिनासाठी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची सुचना करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमावेळी व्यासपिठावर गर्दी होणार नाही याकडे लक्ष देण्याची सुचनाही करण्यात आली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi medium teachers on Adarsh ​​Shikshak Puraskar