मेकॅनिक्‍स चालक तर अधिकारी बनले वाहक; संघटनेची भूमिका ठामच 

Mechanics became drivers officers become carriers belgaum marathi news
Mechanics became drivers officers become carriers belgaum marathi news

बेळगाव : परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परिवहन सेवेच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. परिवहन आगारातील नियंत्रक म्हणून सेवा बजावणारे अधिकारी आता वाहक म्हणून काम करत असून मेकॅनिक्‍स चालक बनून बस चालवित आहेत. दरम्यान, नोटीस बजावलेल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांपैकी ४ कर्मचारी कारवाईच्या भीतीने शुक्रवारी (ता. ९) कामावर हजर झाले.
सहावे वेतन आयोगाच्या शिफारसी परिवहन कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याच्या मागणीसाठी परिवहन कर्मचारी संघटनेने पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. 

गुरुवारी (ता. ८) परिवहन विभागात काम करणाऱ्या ३६ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. यासह शिवाजीनगर येथे परिवहन कर्मचाऱ्यांचे क्‍वॉटर्स असून अडचणीच्या वेळेत परिवहन कर्मचारी सेवेवर हजर व्हावेत, या उद्देशाने येथे काही कर्मचाऱ्यांना संकुले देण्यात आली आहेत, पण ते कर्मचारीही संपावर असल्याने परिवहनच्या सुरक्षा रक्षकांनी अशा क्‍वॉटर्समध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना सेवेवर हजर राहण्याची नोटीस बजावली.

 नोटिसीत, परिवहनचे क्‍वॉटर्स कर्मचाऱ्यांना अडचणीच्या काळात उपलब्ध व्हावेत यासाठी देण्यात आले आहेत. मात्र, संप सुरु असतानाही क्‍वॉटर्समधील कर्मचारी कामावर गैरहजर राहिल्याने क्‍वॉटर्स सुविधा मागे घेतली जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. हुबळी आणि बंगळूर विभागात काम करणाऱ्या काही प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न परिवहन महामंडळाने चालविला आहे. मात्र, अजूनही कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आहे.

सध्या परिवहन कर्मचाऱ्यांची गरज भासत असल्याने अधिकाऱ्यांनाच ही सेवा बजावण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासाठीच विविध मार्गांवर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. नोटीस बजावल्यानंतर चार कर्मचारी सेवेवर हजर झाले असून इतर काही कर्मचाऱ्यांनी सेवेवर हजर राहणार असल्याचे कळविले आहे. 
- महादेव मुंजी, नियंत्रक, परिवहन बेळगाव विभाग

मनुष्यबळाची कमतरता कायम
सध्या परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेवला असल्याने परिवहनच्या बसेससाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे परिवहनच्या विविध आगारात काम करणारे अधिकारीच आता वाहक म्हणून कामावर हजर झाले आहेत. वडगाव आणि रामतीर्थनगर मार्गावर दोघा आगार नियंत्रकांची वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर सर्व मार्गावर परिवहनमधील मॅकेनिक्‍सची चालक म्हणून मदत घेतली जात आहे. बेळगाव विभागीय कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांनाही विविध मार्गावर वाहक म्हणून नियुक्त केले जात आहे. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com