आकांक्षांपुढती जिथे आभाळही ठेंगणे! 

Meeting the affection of the handicapped students
Meeting the affection of the handicapped students
Updated on

नगर : दिव्यांगत्वावर मात करत आत्मविश्‍वासाने जगताना, आकांक्षांपुढती जिथे आभाळही ठेंगणे हे सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांची झलक नगरकरांनी अनुभवली दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात. कुणी नृत्याविष्काराचे दर्शन घडविले, कुणी चित्रकलेचा उत्कृष्ट नमुना पेश केला, तर कुणी आपल्या तोंडालाच हाताचे रूप देऊन दातात पकडलेल्या पेनातून सुंदर अक्षरात लिहिण्याचे कसब दाखविले... 

बंधन लॉन येथे हा मेळावा पार पडला. त्यात दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांना अवाक्‌ केले. संगीताच्या तालावर थिरकत कलाविष्कार सादर केला. साईद्वारका सेवा ट्रस्ट, हेल्प मी इंडिया, प्रहार अपंग संघटना, सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या दिव्यांग स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

दिव्यांगांच्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. 

सलग दुसऱ्या वर्षी पार पडलेल्या या दिव्यांग स्नेहमेळाव्यात जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. उत्कृष्ट नृत्य, चित्रकला, तोंडात पेन धरून लिहिणे, अशा विविध कलागुणांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. दिव्यांगांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. 
प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नरेंद्र फिरोदिया, "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील, व्याख्याते गणेश शिंदे, युवा नेते ऍड. धनंजय जाधव, नगरसेविका सुप्रिया जाधव यांच्यासह दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

अपंग संघटनांचे कार्य अभिमानास्पद

फिरोदिया म्हणाले, ""दिव्यांगांचा स्नेहमेळावा हा प्रेरणा व ऊर्जा देणारा क्षण आहे. परिस्थितीवर मात करीत दिव्यांग विद्यार्थी आपले कर्तृत्व सिद्ध करीत असून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साईद्वारका सेवा ट्रस्ट, हेल्प मी इंडिया व विविध अपंग संघटनांचे कार्य अभिमानास्पद आहे.'' 

राजकारणापलीकडच सामाजिक कार्य
डॉ. बोठे पाटील म्हणाले, ""धनंजय जाधव व टीम राजकारणापलीकडच्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. संस्थेच्या माध्यमातून वंचित व दुर्बल घटकांना ते मदत करीत असून, वंचितांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे कार्य करीत आहेत.'' 
ऍड. जाधव यांनी, गेल्या दोन वर्षांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले. डॉ. अमोल बागूल यांनी सूत्रसंचालन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vedika Dake Mumbai Police success story
Muslim community prayer in Sangli
son dies after mother death in nipani
Marathi News Esakal
www.esakal.com