'निळवंडे'च्या कामासाठी मंत्री थोरात सरसावले 

'निळवंडे'च्या कामासाठी मंत्री थोरात सरसावले 
Updated on

शिर्डी : निळवंडे कालव्यांच्या कामाला गती द्या. कुठल्याही परिस्थितीत येत्या सहा महिन्यांत धरणाच्या मुखाकडून पहिल्या अठ्ठावीस किलोमीटर अंतरातील कालव्याचे काम वेगाने पूर्ण करून कळसच्या बोगद्यापर्यंत पाणी आणा, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर थोरात यांनी पहिलीच बैठक निळवंडे कालव्यांसाठी घेतली. आजवर या कालव्यांच्या कामासाठी संघर्ष करीत असलेल्या निळवंडे कृतिसमितीच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले. जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व ठेकेदाराला समोरासमोर बसवून या कामातील अडचणी जाणून घेतल्या. कुठल्याही परिस्थितीत पहिल्या अठ्ठावीस किलोमीटर अंतरातील कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. लवकरच आपण या कामाची पाहणी करणार असल्याचेही सांगितले. निळवंडे कृतिसमितीचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब वर्पे, गंगाधर गमे, नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, दादासाहेब पवार, रवींद्र गागरे व संजय येलम आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

याबाबत माहिती देताना निळवंडे कृतिसमितीचे अध्यक्ष प्रा. वर्पे म्हणाले, की संगमनेर तालुक्‍यात घुलेवाडी भागात कालव्यांसाठी भूसंपादन करायचे होते. पूर्वी त्यासाठी तेवीस हेक्‍टर जमीन संपादित करावी लागणार होती. भूसंपादनासाठी दोनशे पस्तीस कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. अधिकाऱ्यांनी त्यातून मार्ग काढला. आता त्यासाठी केवळ ब्याऐंशी कोटी रुपये खर्च येईल. त्यासाठी निधीची तरतूद झाली आहे. कालव्यांच्या कामासाठी आता कुठलीही अडचण राहिली नाही. 

निळवंडे कालव्यांसाठी आम्ही गेल्या वीस वर्षांपासून जिवाचे रान केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नेटाने प्रयत्न करून निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले. आता कालव्याचे कामही तेच पूर्ण करतील. खासदार सदाशिव लोखंडेदेखील आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. या दोन्ही नेत्यांचे महाआघाडी सरकार सत्तेत आल्याने निळवंडे कालव्यांच्या दुष्काळी टापूतील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पुढील दीड वर्षात दुष्काळी भागात पाणी येईल. याबाबत आमच्या मनात शंका राहिली नाही. 
- नानासाहेब शेळके, संस्थापक, निळवंडे कृतिसमिती 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com