Sangli Crime : कवठेमहांकाळ तालुका हादरला! मतिमंद महिलेवर अत्याचार; चार नराधमांना अटक

कवठे महांकाळ तालुक्यातील एका गावात मतिमंद महिलेवर झालेल्या अत्याचारातील चार नराधमांना अटक केली आहे.
Mentally Retarded Woman Molestation in Kavathe Mahankal
Mentally Retarded Woman Molestation in Kavathe Mahankalesakal
Summary

मुलीच्या आईने कवठे महांकाळ पोलिसात मोरे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. आता चार नावे निष्पन्न झाली आहेत.

शिरढोण : कवठे महांकाळ तालुक्यातील एका गावात मतिमंद महिलेवर झालेल्या अत्याचारातील चार नराधमांना अटक केली आहे. पांडा मोरे (वय६५), नवनाथ यशवंत सुतार (वय१९), वीरुपक्ष शामराव सुतार (वय४९), प्रवीण दगडू सुतार (वय३०) सर्व रा. हिंगणगाव ता. कवठेमहांकाळ अशी अटक केलेल्या नाराधमांची नावे आहेत. ही कारवाई कवठेमहांकाळ पोलिसांनी (Kavthemahankal Police) केली आहे.

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात मतिमंद महिलेवर पांडा मोरे या आरोपीने अत्याचार केल्याचा मुलीच्या आईने कवठे महांकाळ पोलिसांत मोरे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. आता चार नावे निष्पन्न झाली आहेत.

Mentally Retarded Woman Molestation in Kavathe Mahankal
Raireshwar Fort : 'तो' सेल्फी ठरला अखेरचा! रायरेश्वर किल्ल्यावरुन खाली दरीत कोसळून हुपरीच्‍या तरुणाचा मृत्यू

कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील एका मतिमंद महिलेवर गेल्या काही दिवसांपासून घरी कोणी नसल्याचे पाहून हिंगणगाव (Hingangaon) येथील संबंधित महिलेच्या घरात त्या मतिमंद महिलेवर अत्याचार केल्याचे निदर्शनास आले होते या अत्याचारातील अन्य तीन जणांची नावे समोर आली आहेत.

Mentally Retarded Woman Molestation in Kavathe Mahankal
Govind Pansare Case : शरद कळसकरने जाळल्या डायऱ्या, मोबाईल हॅण्डसेट; पानसरे हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर

आता आरोपीची संख्या चार वर पोचली असून पांडा मोरे, नवनाथ सुतार, विरुपक्ष सुतार , प्रवीण सुतार अशी चार आरोपी असून यातील पांडा मोरे याच्याकडे मोबाईल नसल्याने त्याचा संपर्क होत नव्हता तो पशार होता. शेवटी त्यास कुंभारी ता. जत, दिघे सुतार यांना हिंगणगाव ता. कवठे महांकाळ असे मिळून चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मतिमंद महिलेवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विनायक मसाळे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com