विखे पाटलांनी मंत्री थोरातांवर टीका करताच वाळूमाफियांवर कारवाई

minister thorat criticizes vikhe patil for sand scandal
minister thorat criticizes vikhe patil for sand scandal

संगमनेर ः सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर टाकलेले व्हीडीओ, केलेली चर्चा व भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू माफियांबाबत थेट महसूलमंत्र्यांवर साधलेल्या निशाण्यामुळे महसूल विभाग पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून, अवैध वाळू वाहतुकीची वाहने पकडून दंडात्मक कारवाई करण्यास पथकांनी सुरवात केली आहे. 

महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्रंदिवस राजरोस सुरु असलेला संगमनेर तालुक्याच्या नदीपात्रातील वाळू उपसा सार्वत्रिक चिंतेचा विषय ठरत असताना, महसूल विभागाची सुस्ती अनेकांच्या डोळ्यात भरली.

तालुक्यातील मुळा, प्रवरा, म्हाळुंगी, आढळा या नद्यांच्या पात्रातून अवैधरित्या गौणखनिजाची चोरी सुरु आहे. कारवाई होत नसल्याने वाळूतस्करांचे चांगलेच फावले होते. संगमनेर शहराजवळील प्रवरा नदीपात्र, संगमनेर खुर्द, धांदरफळ, रायते, वाघापूर शिवारातील नदीपात्राची चाळण झाली आहे.

भरदिवसा शहराजवळ वाळू चाळून रिक्षांद्वारे वाहतूक केली जाते. तर पठारातील मुळा नदीपात्रातून असंख्य ठिकाणाहून ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, डंपर मधून पोकलेन, जेसीबीच्या वापराने वाळूतस्करी होते. महसूल विभागाला यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो आहे. विविध प्रसार माध्यमातून यावर आवाज उठू लागल्याने, महसूल विभाग पुन्हा जागा झाला असून, स्वतंत्र पथकांची गस्त सुरु केली आहे. मात्र संगमनेर शहर व उपनगरांमध्ये सुरु असलेली लहान मोठ्या बांधकामांची संख्या व तेथील वाळूचे साठे पाहता, महसूल विभागाने याकडे केलेल्या दुर्लक्षाची कल्पना येते.


याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट आरोप केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणी थोरात यांनी हस्तक्षेप करुन पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभुत ठरणाऱ्या वाळू तस्करीला पायबंद घालावा, वाळू तस्कर तसेच महसूलच्या स्थानिक तलाठी, मंडलाधिकारी व वरिष्ठांचे मोबाईल संभाषणाचे रेकॉर्ड तपासावेत, वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com