

Ishwarpur village incident site where four men allegedly attacked a local after a minor dispute.
Sakal
ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे किरकोळ वादातून राग आल्याने चौघांनी मिळून एका व्यक्तीवर धारदार शस्त्र व लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी सचिन शामराव जाधव, प्रथमेश योगेश घोलप, नयन दीपक घोलप आणि अनिस प्रकाश जाधव (सर्व रा. कामेरी, ता. वाळवा) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.