सैराटपणाचा कळस ः तो म्हणाला, किस दे नाही तर.. 

girls sexual abuse
girls sexual abuse

पारनेर : महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर तरूण आणि तरूणींमध्ये प्रेमाचा संचार होतो. विशेषतः ग्रामी महाविद्यालयात अजूनही शहराइतका प्रेमबहर आलेला नाही. मात्र, त्यांचे अनुकरून करीत आडनिड्या वयात काहीजण हिरोगिरी करायला जातात. त्यांनाही वाटतं आपली कोणीतरी मैत्रिण असावी. आणि ती नाहीच मिळाली तर तिला कोणत्याही स्थितीत आपली बनविण्यासाठी डरमधील शाहरूख खान तिचा पिच्छा पुरवतात.

या एकतर्फी प्रेमातून ऍसीड हल्ले होतात. कधीकधी खूनही पाडले जातात. पारनेरमधील एका मुलाने त्याचाच कित्ता गिरवला. आणि सैराटपणाचा कळस गाठला. 

या बाबत समजलेली माहिती अशी : तालुक्‍यातील एका शाळेच्या प्रवेशद्वारावर काल दुपारी साडेबारा वाजता तो सैराट मुलगा एका मुलीची वाट पाहत उभा राहिला. त्या शाळेची विद्यार्थिनी असलेली मुलगी तेथे आल्यानंतर दुचाकी आडवी लावून मुलाने तिचा रस्ता अडविला.

 मी तुझ्या अंगावर ऍसिड टाकीन
""माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला "किस' करू दे. तू माझी नाही तर कोणाचीच होणार नाही. तू माझे वाटोळे केले, तर मी तुझ्या अंगावर ऍसिड टाकीन, नाही तर तुला फाडून टाकीन,' अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेत विनयभंग केल्याची घटना तालुक्‍यातील एका माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारातच काल (शुक्रवारी) घडली.

ठाण्यात फिर्याद दिली
तिला शिवीगाळ करून, ऍसिड टाकण्याची आणि कापण्याची धमकी दिली. पीडित मुलीने पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध 354, 354 ( 3) (12), 341 यासह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 7, 8, 11 ( 4), 12 यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शाळेतील मुली भेदरल्या आहेत. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांन घटनेविषयी माहिती देण्यास नकार दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com