सांगलीत चाललंय तरी काय? शाळकरी मुलानंतर आता मेडिकल काॅलेजच्या विद्यार्थ्यावर भररस्त्यात गोळीबार

युवकाच्या दंडात जखम होऊन रक्त येत असल्याने तो तातडीने खासगी रुग्णालयात दाखल झाला.
Sangli Crime
Sangli Crimeesakal
Summary

शहरात काल एका शालेय मुलावर हल्ला झाला. त्यानंतर आता महाविद्यालयीन तरुणावर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.

सांगली : शहरातील जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या परिसरात रत्नजित विजय पाटील (वय २०, रा. होळीचा टेक, कवलापूर, ता. मिरज) या महाविद्यालयीन तरुणावर (College Student) अज्ञाताने गोळीबार केला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

Sangli Crime
जिद्द असावी तर अशी! रत्नागिरीच्या 12 ट्रेकर्सनी तब्बल साडेबारा हजार फूट उंचीवरील 'केदारकंठ' शिखर केलं सर

युवकाच्या दंडात जखम होऊन रक्त येत असल्याने तो तातडीने खासगी रुग्णालयात दाखल झाला. तोपर्यंत त्याला गोळी घुसल्याची कोणतीही कल्पना नव्हती. एक्सरे काढल्यानंतर लहान आकाराची गावठी बंदुकीची गोळी (Sangli Crime) दंडात घुसल्याचे निष्पन्न झाले.

गोळीबार कोणी केला, याबाबत कोणतीच माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकलेली नाही. दरम्यान, याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. सध्या युवकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरात काल एका शालेय मुलावर हल्ला झाला. त्यानंतर आता महाविद्यालयीन तरुणावर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.

शहरात एकापाठोपाठ एक घटना घडत असल्याने भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रत्नजित पाटील हा मिरज मेडिकल महाविद्यालयात (Miraj Medical College) पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तो दुचाकीवरून जुना बुधगाव रस्तामार्गे सांगलीकडे येत होता. रेल्वे फाटकापुढे आला असता त्याला दंडाला काहीतरी लागल्याचे जाणवले. थोड्या अंतरावर त्याने दुचाकी थांबवून पाहिले असता दंडातून रक्त असल्याचे त्याला दिसले. त्याने मित्राला दंडाला दगड लागला असल्याचे सांगून तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले.

Sangli Crime
'ठराव करताना आम्हाला विश्‍वासातच घेतलं नाही'; डाॅ. आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी सात सदस्यांचा मोठा दावा

शहरातील एका खासगी रुग्णालयात तो दाखल झाल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक्सरे काढल्यावर त्यामध्ये दंडात गावठी बंदुकीतून उडालेली लहान गोळी घुसल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी युवकाची विचारपूस केली.

Sangli Crime
ऐतिहासिक वारसा लाभलेलं 'धर्मगिरी तीर्थक्षेत्र'; जैन धर्मियांची आहे पावन भूमी, या ठिकाणी कसे पोहोचाल?

युवकाने पोलिसांना, बंदुकीतून उडालेली गोळी मला लागल्याचे समजले नसल्याची माहिती स्थानिक गुन्हेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. दरम्यान, युवकावर कोणी गोळीबार केला की परिसरात असणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या हातातील बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने युवक जखमी झाला, याबाबत युवकासह पोलिसदेखील अनभिज्ञ आहेत. पोलिस तपासात अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com