

Sugarcane Transport Protest raju shetti
esakal
Miraj Solapur Highway News : मिरज-सोलापूर महामार्गावरून शिरढोण येथून सांगली कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ७८ ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरल्या. या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार राजू शेट्टी यांचे पुत्र सौरभ शेट्टी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी कारखाना प्रशासनाला जाब विचारत लेखी आश्वासन देण्यास भाग पाडले.