
MLA Jayant Patil and MP Vishal Patil during the Aarti of ‘Vitya Cha Raja’ in Vita, reflecting new political equations.
Sakal
विटा : ‘विट्याचा राजा’ गणेशोत्सवाच्या आरतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी उपस्थिती लावली. आमदार सुहास बाबर, अमोल बाबर यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. हा आरती सोहळा खानापूर, आटपाडी तालुक्यातील निवडणुकांत ‘आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू,’ या सुहास बाबर यांच्या विधानामागील राजकीय अर्थ शोधण्याची संधी देणारा ठरला.