esakal | राम शिंदे यांच्या याचिकेवर आमदार रोहित पवार म्हणतात... 
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar criticized Ram Shinde

कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आमदार रोहित राजेंद्र पवार यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिकांमध्ये त्यांना नोटीस बजाविण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी दिले आहेत. ही याचिका माजी मंत्री राम शिंदे व अपक्ष उमेदवार रोहित पवार यांनी दाखल केली आहे. त्यावर आमदार रोहित पवार म्हणाले

राम शिंदे यांच्या याचिकेवर आमदार रोहित पवार म्हणतात... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आमदार रोहित राजेंद्र पवार यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिकांमध्ये त्यांना नोटीस बजाविण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी दिले आहेत. ही याचिका माजी मंत्री राम शिंदे व अपक्ष उमेदवार रोहित पवार यांनी दाखल केली आहे. 

हेही वाचा- कर्जतचे जेल तोडणारे आरोपी सापडले

त्यावर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, ""मला कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नाही. लोकांच्या बोलण्यातूनच कळतंय की, राम शिंदे कोर्टात गेले आहेत. ते कशासाठी कोर्टात गेले आहेत, त्यांनी काय मुद्दे मांडले, हे नोटीस हाती आल्यावरच समजेल. त्यानंतर मी त्यावर भाष्य करीन. मात्र, सध्या तरी माझ्यापर्यंत समन्स आलेले नाही.'' 

आम्ही आमची बाजू मांडू

""विजय-पराजय स्वीकारायचे असतात. विजयी होतात, ते काम करायला सुरवात करतात. राम शिंदे यांचा पराभव झाला, ते कोर्टात गेले. ठिक आहे. त्यांचा कोर्टावर विश्‍वास असेल, ते त्यांची बाजू मांडतील. आम्ही आमची बाजू मांडू,'' असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. 

काहीही निष्पन्न होणार नाही

यामध्ये राजकारण असू शकतं का, या प्रश्‍नावर रोहित पवार म्हणाले, ""तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण, लोकशाहीत लोकांचा कौल स्वीकारावा लागतो. त्यांना कोर्टाच्या मदतीने काही म्हणायचं असेल, तर ते त्याठिकाणी मांडतील. लोकांचा कौल काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मी प्रामाणिकपणे निवडणूक लढलो. लोकांनी आपल्या ताब्यात ती निवडणूक घेतली होती. त्यामुळे जो निर्णय होता, तो लोकांचा होता. शिंदे कोर्टात गेले असले, तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.'' 

राम शिंदे याचिकेत म्हणतात

दरम्यान, राम शिंदे यांच्या याचिकेनुसार, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित राजेंद्र पवार (ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू) यांनी जामखेड कर्जत मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. रोहित पवार यांनी मतदारांना लाच देणे, राम शिंदे यांची बदनामी करणे, निवडणूक खर्चाचे तपशील लपविणे आदींचा आधार घेत निवडणुकीत विजय मिळविल्याचा आरोप श्री. शिंदे यांनी याचिकेत केला आहे. तसेच बारामती ऍग्रो लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना सुटी देऊन जामखेड कर्जत मतदारसंघात पाठविले, सदर कर्मचाऱ्यांनी घरोघरी मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये दिले, तसेच ऍग्रोच्या संबंधित कर्मचाऱ्यांना वरील कृत्य करीत असताना ताब्यात घेण्यात आले होते, कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद झाल्याचेही याचिकेत म्हटले आहे. 

जाणून घ्या- पोलिस गेले कर्जतच्या आरोपीच्या शोधात, सापडले हे घबाड 

अपक्ष उमेदवार रोहित पवार यांचीही याचिका

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रोहित पवार यांनीदेखील विद्यमान आमदार रोहित पवार यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार, त्यांना निवडणूक अर्जात दुरुस्ती करण्याची संधी न देता निवडणूक अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यात आल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, दोन्ही निवडणूक याचिकांची एकत्रित सुनावणी झाली असताना न्यायालयाने आमदार रोहित पवार यांच्यासह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. दोन्ही याचिकाकर्त्यातर्फे ऍड. सतीश तळेकर यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी 13 मार्च रोजी होणार आहे. 

loading image