
मयुरी पोलिस मैदानावर खेळायचा सराव करण्यासाठी मोटारसायकलवरून नेहमीच राजाराम बंधाऱ्यावरून ये-जा करत असते. आज सकाळी दहाच्या सुमारास मैदावरून सराव करून ती राजाराम बंधाऱ्यावरून केर्लीला निघाली होती.
अन् मोपेडस्वार तरुणी पडली नदीत...
कसबा बावडा (कोल्हापूर) ः येथील राजाराम बंधाऱ्यावरून जाताना वाहनाचा धक्का लागून केर्ली येथील मोपेडस्वार तरुणी नदीत पडली. मात्र पोहता येत असल्याने ती सुखरूप बाहेर आली. मयुरी अनिल कोपार्डे (वय 22) असे तिचे नाव आहे.
मयुरी पोलिस मैदानावर खेळायचा सराव करण्यासाठी मोटारसायकलवरून नेहमीच राजाराम बंधाऱ्यावरून ये-जा करत असते. आज सकाळी दहाच्या सुमारास मैदावरून सराव करून ती राजाराम बंधाऱ्यावरून केर्लीला निघाली होती. राजाराम बंधाऱ्यावर समोरून आलेल्या वाहनाचा तिच्या मोपेडला धक्का लागताच मयुरीचा तोल जाऊन मोपेडसह पाण्यात पडली. बंधाऱ्यावर उपस्थित काही नागरिकांनी अग्निशामक दलाला घटना कळविली; पण मयुरीला पोहता येत असल्यामुळे अग्निशामक दल येण्यापूर्वीच ती पाण्यातून पोहत बाहेर आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मयुरीची मोपेड बाहेर काढली. मयुरीच्या धाडसाचे नागरिकांनी कौतुक केले.
हेही वाचा - पोलिस अधीक्षक देशमुखांनीच का मारला ठिय्या ?
वाहतूक धोकादायक
"सकाळ'मध्ये नऊ तारखेला "राजाराम बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक' अशी बातमी ठळक प्रसिद्ध केली होती. तरीसुद्धा प्रशासनाला याची जाग आलेली दिसत नाही. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असे नागरिकांतून बोलले जाते आहे.
हेही वाचा - पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायचाय मग हे करा....