पोलिस अधीक्षक देशमुखांनीच का मारला  ठिय्या ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील चोरी अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. जनतेला विश्‍वास देण्याचे काम पोलिस करतात. मात्र, पोलिस ठाण्यातच झालेली चोरी जनतेच्या मनात पोलिस यंत्रणेबद्दल असमाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जयसिंगपूर, (कोल्हापूर) ः  येथील पोलिस ठाण्यात मोबाईल आणि रोकड चोरीप्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुखांनी रविवारी रात्री तब्बल सात तास ठिय्या मारुन तपासाची माहिती घेतली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे उपस्थित होते. 

जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील चोरी अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. जनतेला विश्‍वास देण्याचे काम पोलिस करतात. मात्र, पोलिस ठाण्यातच झालेली चोरी जनतेच्या मनात पोलिस यंत्रणेबद्दल असमाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशी केली जात आहे. चार स्वतंत्र पथकाव्दारे तपास यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. बहुदा अशी राज्यातील पहिलीच घटना असल्याने पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेला सावरण्याचा प्रयत्न म्हणून कोणत्याही परिस्थितीत आरोपीचा छडा लावण्यासाठी पोलिस यंत्रणा राबत आहे. 

हेही वाचा - रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागा ; कोल्हापूरात शिवप्रेमी भडकले 

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह जयसिंगपूर पोलिस तपास कामात सक्रिय आहे. तर याआधी पोलिस ठाण्यात सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची मदत तपास कार्यात घेतली जात आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीत तरुण अस्पष्ट दिसत असल्याने तपास कार्यात अडथळा येत आहे. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान केले आहे. मात्र, अद्याप आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले नाही. विविध पोलिस ठाण्याअंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही चौकशी केली जात आहे. 

रविवारी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी सात तास पोलिस ठाण्यात तळ ठोकून तपास यंत्रणेची माहिती घेतली. स्वत: पोलिस प्रमुखांनी पोलिस ठाण्यात हजेरी लावत दिर्घ काळ तळ ठोकल्याने संशयीताचा माग लागल्याची चर्चा पोलिस ठाणे परिसरात होती. 

हेही वाचा - पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायचाय मग हे करा.... 

गाफीलपणा नडला 

पोलिस ठाण्याच्या कारकून रुमच्या मागील बाजूचा दरवाजा खराब झाला होता. याबाबत गाफील राहिल्याने हा प्रसंग उदभवला. मागील बाजूने पोलिस ठाण्यात येणारा कुठल्याही सीसीटीव्हीत कैद होत नाही. त्यामुळे मागील बाजू अधिक सुरक्षित असणे गरजेचे होते. गाफीलपणाच नडल्याची भावना पोलिस ठाण्यातील कर्मचारी बोलून दाखवत आहेत. 

इचलकरंजी एलसीबी सक्रिय होणार का? 

जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील चोरीप्रकरणी कोल्हापूर एलसीबी सक्रिय आहे. मात्र, इचलकरंजी एलसीबी अद्याप म्हणावी तशी सक्रिय नाही. जयसिंगपूर पोलिस ठाण्यात सेवा बजावलेल्या एका कर्मचाऱ्याव्यतिरीक्त अन्य कोणी यात अद्याप सहभागी नसल्याची चर्चा आहे. इचलकरंजी एलसीबीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजवर अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामुळे इचलकरंजी एलसीबी याप्रकरणी सक्रिय होण्याची गरज आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Officer Abhinave Deshmukh Agitation kolhapur marathi news