तिकडे जेसीबीद्वारे गुलालाची उधळण, इकडे... विखेंची रोहित पवारांवर टीका

MP Dr Sujay Vikhe criticizes MLA Rohit Pawar
MP Dr Sujay Vikhe criticizes MLA Rohit Pawar

शिर्डी : तिकडे विधानसभा निवडणुकीनंतर मोठमोठे हार-तुरे, जेसीबीद्वारे गुलालाची उधळण होत असताना, शिर्डीत आम्ही 800 कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ दिला, अशा शब्दांत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता कोपरखळी मारली. 

प्रवरानगर येथे तहसील कार्यालय, कृषी विभाग व पंचायत समितीतर्फे विविध योजनांतील लाभार्थींना धनादेशाचे वितरण करताना डॉ. विखे पाटील बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, सभापती नंदा तांबे, उपसभापती ओमेश जपे, प्रवरा बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, उपाध्यक्ष पोपट असावा, प्रातांधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार कुंदन हिरे आदी उपस्थित होते. 

मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी धडपड

डॉ. विखे म्हणाले, ""रेशनकार्ड नाही, असे एकही कुटुंब शिर्डी मतदारसंघात नाही. असा हा एकमेव मतदारसंघ आहे. आज राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आपल्याला मिळालेल्या खात्याद्वारे काय काम करायचे, हे माहित नसताना केवळ मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी धडपड सुरू आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कोणतेही पद नाही. त्यामुळे आता काय होणार, याची चिंता अनेकांना लागली आहे. जनतेचा आशीर्वाद हेच आमच्या कुटुंबासाठी महत्वाचे आहेत. या मतदारसंघातील एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही.'' 

लाभार्थींना धनादेशाचे वितरण

श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना, मोफत अपघातविमा योजनेचे धनादेश, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, कृषी विभागामार्फत ट्रॅक्‍टर व राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य, संजय गांधी, महिला बचतगट आदी योजनांतील लाभार्थींना धनादेशाचे वितरण करण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com