सांगलीच्या विकासात विमानतळ महत्त्वाचं असेल, तर मी सर्व ते सहकार्य करेन; मंत्री सिंधियांनी दिला शब्द

नवनवीन उद्योग सांगलीत येण्याची संधी निर्माण होईल.
MP Sanjay Patil met Minister Jyotiraditya Scindia Regarding Sangli Airport
MP Sanjay Patil met Minister Jyotiraditya Scindia Regarding Sangli Airportesakal
Summary

'केंद्राच्या प्रवासी वाहतूक, तसेच ‘कृषी उडान-२’ या महत्त्वाकांक्षी योजनेत कवलापूर-सांगली विमानतळाचा समावेश करावा.'

सांगली : ‘कवलापूर-सांगली विमानतळासाठीचा (Sangli Airport) प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठवा. त्यानंतर मी लगेच समिती पाठवून जागेचे सर्वेक्षण करून घेतो, अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांना दिली.

केंद्राच्या प्रवासी वाहतूक, तसेच ‘कृषी उडान-२’ या महत्त्वाकांक्षी योजनेत कवलापूर-सांगली विमानतळाचा समावेश करावा,’ अशी मागणी खासदार संजय पाटील यांनी शिंदे यांच्याकडे केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘सांगलीच्या विकासात विमानतळ महत्त्वाचे असेल, तर मी सर्व ते सहकार्य करेन,’ असा शब्द दिला.

MP Sanjay Patil met Minister Jyotiraditya Scindia Regarding Sangli Airport
देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लवकरच 'रामराज्य' येईल; जितेंद्र सरस्वती महाराजांचं मोठं वक्तव्य

खासदार पाटील म्हणाले, ‘कवलापूर येथील विमानतळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी केली. या विमानतळाचा केंद्राच्या ‘कृषी उडान योजना-२’मध्ये समावेश करावा. या विमानतळामुळे प्रवासी वाहतुकीसोबत जिल्ह्यात उत्पादित कृषी व फलोत्पादनांची वाहतूक करता येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी हे विमानतळ होणे महत्त्वाचे आहे, अशी आग्रही भूमिका मांडली आहे.’

MP Sanjay Patil met Minister Jyotiraditya Scindia Regarding Sangli Airport
कोकणात 'अणुऊर्जा, रिफायनरी'ला विरोध असताना माशेलकरांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, सरकारनं माझ्यावर जबाबदारी टाकली तर..

ते म्हणाले, ‘द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, हळदीसह अन्य कृषी उत्पादने देशभरात तसेच परदेशातही गतीने पोहोचविण्यास मदत होईल. कृषिप्रक्रिया उद्योजकांच्या व्यवसायवाढीसही चालना मिळेल. देशभरातील विविध शहरांशी जोडले गेल्याने सांगलीच्या दळणवळणाला गती येईल. नवनवीन उद्योग सांगलीत येण्याची संधी निर्माण होईल.’ खासदार पाटील यांच्यासमवेत केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील व खासदार संजीव नाईक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com