esakal | ...म्हणून हाेतेय सातारकरांच्यात पून्हा श्रीनिवास पाटलांची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून हाेतेय सातारकरांच्यात पून्हा श्रीनिवास पाटलांची चर्चा

पोलीस प्रशासनाने आता पोलीस मुख्यालय ते शनिवार चौक इथं पर्यंत केवळ दुचाकींना परवानगी दिली आहे. यावेळी पाेलीस खाते आणि व्यापारी यांच्यात खासदार श्रीनिवास पाटील यांनी समन्वय साधला.

...म्हणून हाेतेय सातारकरांच्यात पून्हा श्रीनिवास पाटलांची चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : आमचा व्यवसाय थंडावला आहे. ते देखील वाहतुकीत झालेल्या बदलामुळे. आम्ही सातत्याने वाहतुकीत बदल करा अशी मागणी करीत आहे. परंतु ती मान्य हाेत नाही. काेणी तरी काही तरी करा हाे अशी आर्त हाक सातत्याने सातारा शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील मार्गावरील व्यापारी करीत हाेते. अखेर त्यांच्या मागणीस प्रदीर्घ कालावधीनंतर मान्यता मिळाली आहे. त्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या कार्यशैलीतून प्रश्न तडीस नेल्याची चर्चा सातारा शहारात रंगू लागली आहे. 


ग्रेड सेपरेटरचे काम अंतिम टप्यात आले आहे, ते काम पुर्ण होईपर्यंत शहरातील सुरळीत होण्यासाठी पुर्वीची एकेरी वाहतूक केवळ दुचाकींसाठी सुरु करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालय ते मोती चौकापर्यंत एकेरी वाहतुकीमुळे व्यवसायावर परिणाम झाल्याने तिथे शिथिलता आणावी अशी मागणी व्यापारी वर्गाची गेल्या तीन महिन्यांपासून होती. तसेच ग्रेडसेपरेटरचे काम पुर्ण होईपर्यंत एकेरी वाहतुकच बंद करा अशीही मागणी जोर धरु लागली होती.
 
सातारा शहरात राजपथावर दूहेरी वाहतुक तसेच कर्मवीर भाऊराव पाटील पथावर पोलीस मुख्यालय ते मोती चौक असे एकेरी वाहतुकीचा प्रयोग पोलिसांकडून करण्यात आला आहे.

अवश्य वाचा -  खासदार सुप्रिया सुळेंची उदयनराजेंवर खाेचक टीका

यामुळे कर्मवीर पथावरील व्यवसाय ठप्प होत आहे असे म्हणत येथील व्यापारी वर्गाने गेल्या काही महिन्यांपासून पोलीस मुख्यालय ते मोती चौक हा मार्ग दूहेरी करावा अशी मागणी केली. त्यासाठी गांधीगिरी मार्गाने आंदाेलन केले. त्यातूनही मार्ग निघाला नाही.
अखेर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर व्यापारी व पोलीस प्रशासन यांच्या बैठका झाल्या परंतु त्यातून पण कोणताच निघाला नाही. 

नक्की वाचा - हे केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

त्यानंतर व्यापारी वर्गाने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे धाव घेतली. गत तीन महिन्यांत व्यवसायावर आलेल्या संकटाचे कथन केले. पोलीस मुख्यालय ते मोती चौक हा मार्ग दूहेरी करावा अशी मागणी केली. दरम्यान या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी एक बैठक आयोजित केली. त्यास व्यापारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, वाहतुकदार यांचा समावेश होता. या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर बैठकीतच वाहतुकी संदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली.

या चर्चेतून पोलीस मुख्यालय ते मोती चौक या रस्त्यावर दुहेरी वाहतुक सुरु करण्याविषयी कोणताच मार्ग निघत नसल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी मुद्दा भरकटत चालल्याने अखेर आपल्या शैलीने हस्तक्षेप केला. सर्वांनाच आपल्या शैलीतून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

अखेर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यापारी वर्गा तीन पर्याय समोर ठेवले. त्यामध्ये दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतुक सुरु ठेवणे, मल्हारपेठेतील रस्त्यावर सकाळी नऊ ते दुपारी 12 पर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री आठ पर्यंत अशा वेळेत एकेरी वाहतुक तसेच व्यापारी वर्गाच्या मागणीनूसार पोलीस मुख्यालय ते शनिवार चौक (501 पाटी) रस्त्यावरील पोलीसांचे बॅरिकेटस हटवून केवळ दुचाकी वाहनांना वाहतुकीची परवानगी याचा समावेश होता. या पर्यायांपैकी व्यापारी वर्गाने तिसरा पर्याय निवडला. त्यासाठी सर्वांनी हात उंचावून मान्यता दर्शविला.

या बैठकीत झालेल्या चर्चेनूसार सध्या पोलीस मुख्यालय ते शनिवार चौक (501 पाटी) या रस्त्यावरील बॅरिकेटस हटविण्यात आले आहेत. आता या रस्त्यावर केवळ दुचाकी वाहनांना शनिवार चौकापर्यंत जाता येत आहे.

हेही वाचा - एकेरी वाहतूक हटवा, अन्‌ व्यवसाय वाचवा ; व्यापाऱ्यांची निदर्शने

या बैठकीस शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, शिवसेना नेते नरेंद्र पाटील, व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी प्रकाश गवळी, गुरुप्रसाद सारडा, कॉंग्रेस नेत्या सुजाता घोरपडे उपस्थित होत्या.