Video : उदयनराजे म्हणतात, 'राजकारणापासून दूर व्हायचंय'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

खासदार उदयनराजे  भोसले यांना भेटण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी आले होते. यावेळी उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

सातारा :  "राजकारणातून अलिप्त व्हायचा विचार करतोय,'' अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाजप प्रवेश आणि राजकारणातील नवी इनिंगविषयी आज (शुक्रवारी) दिली.

खासदार उदयनराजे  भोसले यांना भेटण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी आले होते. यावेळी उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक छोटे-बडे नेते पक्षांतर करत आहेत. भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून मेगा गळती सुरू आहे. सातारचे खासदार छत्रपती उदयनराजेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह या सगळ्याला कारणीभूत आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंनी हा निर्णय घेतला असे म्हटले जात आहे.

धाकट्या बंधूंना मदत करावीच लागेल : खासदार उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी तीनही राजेंना गमावणार; उदयनराजे भाजपच्या वाटेवर

राजकारणातील नवीन समीकरणे सुरू करत असल्याने भिडे गुरुजी तुमच्या भेटीला आलेत का, यावर उदयनराजे म्हणाले, असे काही नाही, हे माझे एकट्याचे घर नाही, मला कोणीही भेटायला येऊ शकते. 

भाजप प्रवेशाची तारीख कधी निश्चित होईल, या प्रश्नावर त्यांनी 'अजून काहीही ठरले नाही' असे सांगून या प्रश्नाला बगल दिली. तर आता राजकारणापासून अलिप्त व्हायचा विचार करतोय, असे सांगत तुमच्या सारख्या मित्रांसमवेत राहायचा विचार करतोय असे त्यांनी स्पष्ट केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Udyanraje Bhosale comment about the detached from politics