esakal | 'ग्लॅमर'च्या जगात सांगलीच्या कन्येची भरारी; 'मिसेस इंडिया'मध्ये मानकरी I Mrs India 2021
sakal

बोलून बातमी शोधा

'ग्लॅमर'च्या जगात सांगलीच्या कन्येची भरारी; 'मिसेस इंडिया'मध्ये मानकरी

गेल्या वर्षभरापासून विविध पातळ्यांवर सुरू असलेली स्पर्धा आणि आव्हानात्मक अंतिम फेरीत लक्षवेधी कामगिरी करत त्यांनी बाजी मारली.

'ग्लॅमर'च्या जगात सांगलीच्या कन्येची भरारी; 'मिसेस इंडिया'मध्ये मानकरी

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : ‘ग्लॅमर’च्या जगात सांगलीकर कन्येच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मिसेस इंडिया २०२१ स्पर्धेत येथील मधू नानवाणी (लग्नानंतर करुणा बजाज) या गटविजेत्या ठरल्या आहेत. ग्लॅमरस सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर हा किताब त्यांनी पटकावला आहे. गेल्या वर्षभरापासून विविध पातळ्यांवर सुरू असलेली स्पर्धा आणि आव्हानात्मक अंतिम फेरीत लक्षवेधी कामगिरी करत त्यांनी बाजी मारली.

इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट संस्थेतर्फे मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत देशभरातून काही हजार महिलांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून ४७ महिलांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेच्या निवड समितीत प्रख्यात कलाकार सलीना जेटली, डॉ. आदिती गोवित्रीकर, डॉ. राधाकृष्णन पिल्ले, हॉकी खेळाडू युवराज वाल्मीकी आणि कम्युनिकेशन गुरू सबिरा मर्चंट यांचा समावेश होता.

हेही वाचा: जिल्हा बॅंक रणधुमाळी; कोल्हापुरातील 8 तालुक्यांत लढत अटळ

मधू नानवाणी देशातल्या टॉप पंधरामध्ये निवडल्या गेल्या. त्यात व्यक्तिमत्त्व, फिटनेस, बौद्धिक चाचणी आदि विविध प्रकारच्या परीक्षांना त्यांना सामोरे जावे लागले. पैकी सोशल मीडिया उपक्रमात त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली. प्लास्टिकमुक्त जगाची संकल्पना त्यांनी प्रभावी मांडली. मधू यांचे वय ४९ वर्षे असून त्यांना दोन मुले आहेत. त्या इमेज कोट, इंटरप्रेनर, आणि आंतरराष्ट्रीय वेबिनारस संयोजक आहेत.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी आणि नंतर एमबीए फायनान्स केले आहे. विविध परिषदांमध्ये शोधनिबंध त्यांनी सादर केले आहेत. येथील काँग्रेसचे दिवंगत नेते जयदेव नानवाणी यांच्या त्या कन्या असून मोबाईल व्यावसायिक अजय नानवाणी यांच्या भगिनी आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘आयुष्यात जोपर्यंत आपले स्वप्न पुरे होत नाही तोपर्यंत लढत रहाणे, हा अटीट्युड घेऊन मी पुढे जाते आहे. सांगलीतच माझी जडणघडण झाली आणि तेथेच मला आत्मविश्‍वासही मिळाला.’’

हेही वाचा: होय! माझं हृदय धडकतं उजव्या बाजूला; मला समजलं 37 व्या वर्षी

loading image
go to top