जिल्हा बॅंक रणधुमाळी; कोल्हापुरातील 8 तालुक्यांत लढत अटळ

Co-operative society elections
Co-operative society elections
Summary

लोकसभेपासून ते अलीकडे झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीपर्यंत पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी सर्वच निवडणुका जिंकल्या आहेत.

कोल्हापूर : जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा होत असली तरी जिल्ह्यातील किमान आठ तालुक्यांतील विकास सेवा संस्था गटातच लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. या तालुक्यात विद्यमान संचालकांविरोधांत आघाडीतीलच उमेदवारांनी दंड थोपटले आहे. त्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच थेट भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने बँकेच्या निवडणुकीचे संदर्भच बदलण्याची चिन्हे आहेत.

लोकसभेपासून ते अलीकडे झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीपर्यंत पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी सर्वच निवडणुका जिंकल्या आहेत. त्यातून या दोघांचाही आत्मविश्‍वास दुणावला आहे. या जोरावरच जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी मुश्रीफ यांनी चालवली होती. सहा वर्षांतील उत्तम कारभार, ठेवीसह बँकेच्या प्रगतीत झालेली वाढ या जोरावर जिल्ह्यातून साथ मिळेल अशी त्यांची अटळ आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे आता प्रबळ सत्तास्थान नाही आणि आमदार पी. एन. पाटील यांच्या मुलाला जिल्हा परिषद अध्यक्ष केल्याने तेही आपल्यासोबत राहतील असाही मुश्रीफ यांचा अंदाज आहे; पण त्याला छेद देणाऱ्या घटना काही दिवसांपासून घडत आहेत.

Co-operative society elections
प्रवासी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू

बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आहेत; पण तालुक्यात या आघाडीतच विद्यमान संचालकांविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. त्यातून शिरोळ, गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, गगनबावडा, चंदगड, भुदरगड या सात तालुक्यांत यापूर्वीच विरोधी आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिरोळमध्ये तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात सर्व पक्षीयांनी मिळून ‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे नावही जाहीर केले आहे.

गगनबावडा तालुक्यातून स्वतः पालकमंत्री सतेज पाटील हेच विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांना शह देण्याच्या तयारीत आहेत. राधानगरीतून काँग्रेसकडून विश्‍‍वनाथ पाटील-गुडाळकर यांची तर गडहिंग्लजमधून अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर, चंदगडमधून शिवाजी पाटील-भरमू पाटील गट यांनी एकत्र तयारी सुरू केली आहे. भुदगरगडमधून आमदार प्रकाश आबिटकर गटानेही मेळावा घेऊन आपली दखल घेण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांना केले आहे. अशा परिस्थितीत या तालुक्यातील विकास सेवा गटाची निवडणूक बिनविरोध करताना मुश्रीफ यांचा कस लागणार आहे.

Co-operative society elections
डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

मुश्रीफ यांच्याही विरोधात उमेदवार

कागल तालुक्यातून मुश्रीफ यांच्या विरोधातही उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे या तालुक्यातील आहेत आणि त्याच तालुक्यातून बँकेला उमेदवार मिळत नाही, असा संदेश पक्ष नेतृत्त्वापर्यंत जाऊ नये म्हणून पराभव होणार असला तरी जागा बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणूनही या तालुक्यात भाजपकडून उमेदवार उभा केल्या जाण्याची शक्यता आहे.

महाडिक-कोरे-आवाडे एकत्र

महादेवराव महाडिक, आमदार विनय कोरे व प्रकाश आवाडे यांना पुढे करून भाजप ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यातून कोरे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मुंबईत या विषयावर चर्चा केली. हे समजताच मुश्रीफ यांनी काल कोरे यांच्याशी संवाद साधला. कोरे यांनी तीन जागा मागितल्या असल्या तरी विद्यमान संचालक मंडळात त्यांच्यासह दोन संचालक आहेत. वाढीव जागा मिळणार नाही हे माहिती आहे; पण त्यातून दबाव गट तयार करण्यासाठी त्यांच्याकडून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना वगळा अशीही मागणी पुढे आल्याचे समजते. सोमय्या यांच्या आरोपानंतर अडचणीत आलेल्या मुश्रीफ यांनाच यातून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय यंत्रणा कार्यरत

जिल्हा बँकेत सत्ता मिळो अगर न मिळो; पण सहजासहजी विजय मिळवून द्यायचा नाही अशी व्यूहरचना भाजपने आखली आहे. यासाठी भाजपाच्या केंद्रीय पातळीवर यंत्रणाही कार्यरत झाल्या असून, या यंत्रणेमार्फत शिरोळ, राधानगरी आणि गडहिंग्लजमध्ये वेगळ्या पद्धतीने रणनीती आखली जात आहे.

Co-operative society elections
ZEE5 Global वर रंजक मराठी मालिका, चित्रपट आणि ओरिजनल्सची मेजवानी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com