शंभर फुटी रोड मोकळा श्‍वास कधी घेणार? कारंजे बसवले पण अतिक्रमणे तशीच 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 March 2021

स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता, चौक सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.

सांगली : महापालिका सध्या स्वच्छ सर्वेक्षणच्या तयारीत आहे. शहरातील चौकांचे सुशोभीकरण आणि भिंतींचे सौंदर्यीकरण केले जात आहे. याच पंक्तीत कोल्हापूर रोडला जोडणाऱ्या शंभर फुटी रोडच्या चौकात कारंजे बसवण्यात आले आहेत. या कारंजामुळे चौक चांगलाच खुलला आहे. मात्र याच शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणांमुळे रस्त्याची शोभा गेली आहे. त्याकडेही आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता, चौक सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील मोठे चौक, रस्त्यांचे रुपडे खुलत आहे. याबरोबरच राजर्षी शाहू महाराज रोड म्हणजेच शंभर फुटी रस्त्यावर कोल्हापूर रोडजवळ दुभाजक तयार करण्यात आला आहे. यामध्ये कारंजा बसवण्यात आला आहे. गेले दोन दिवस हा कारंजा रात्रीच्या वेळेस रंगीबेरंगी पाण्याने खुलत आहे. त्यामुळे या चौकाची शोभा वाढली आहे. कोल्हापूरहून सांगलीत येताना शंभर फुटी रोडकडे वळले की या कारंजाने स्वागत होते. त्यामुळे हा कारंजा आकर्षण ठरत आहे. 

हेही वाचा- Good News : मालमत्ता हस्तांतरण नोंदणी करा आता फक्त पाचशे रुपयात

कारंजाने शंभर फुटी रोडवर स्वागत झाले तरी पुढे मात्र रस्त्यावरील अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या गाड्यांनी रस्त्याची शोभा जाते. ही अतिक्रमणे वाहनधारकांना अडचणीची ठरत आहेत. ती मात्र अद्याप हटवण्यात महापालिकेला यश आलेले नाही. यापर्वीही अनेकवेळा या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याबाबत मोहीमा झाल्या आहेत. मात्र अतिक्रमण काढण्याचे नाटक दोन दिवस होते. पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरु होते. त्यामुळे आता आयुक्तांनी या रस्त्यावर कारंजा बसवून रस्त्याचे सौंदर्य वाढवले आहेच तर पुढील अतिक्रमणे काढून रस्ता खुला करावा म्हणजे कारंजाने स्वागत केलेल्या या शंभर फुटी रस्त्याची भव्यताही खुलून दिसेल. 

हेही वाचा- पालकमंत्र्यांनी भरला घरफाळा आता तुम्ही देणी द्या नाहीतर कारखान्याच्या दारात उपोषणाला बसू

फुटी रोडची भव्यताही खुलून दिसेल. 
या रस्त्याला लागूनच पुढे हरिपूर रोडवरुन जाणारा नवीन रिंग रोड जोडला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिकेला हटवावीच लागतील. त्यादृष्टीने आयुक्तांनी आतापासूनच मोहीम राबवण्याची गरज आहे.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation is currently preparing a clean survey sangli political marathi news