Nagpur Goa Shaktipeeth Highway protest in Maharashtra
esakal
नवेखेड (सांगली) : प्रस्तावित नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे. शनिवारी (ता. १८) पंढरपूर येथे ‘सद्बुद्धी यात्रा’ काढण्यात येणार असून, वाळवा तालुक्यासह १३ जिल्ह्यांतील हजारो बाधित शेतकरी त्यात सहभागी होणार (Pandharpur farmers march against highway) आहेत. वाखरी ते विठ्ठल मंदिर असा पायी मोर्चा काढून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.