..असा होतो नंदीध्वज सरावास 

प्रशांत देशपांडे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

- सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांची जानेवारीत यात्रा 
- बाळीवेसेतील मल्लिकार्जुन मंदिरात रात्री सराव 
- नंदीध्वज 68 लिंगांना प्रदक्षिणा घालतात 
- रात्री नऊ ते 12 पर्यंत सराव 

प्रशांत देशपांडे 

सोलापूर :  जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेत सात मानाचे नंदीध्वज असतात. या नंदीध्वजाच्या सरावास आज बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात रात्री सुरवात झाली. 

ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांची यात्रा जानेवारी महिन्यात असते. या यात्रेत सात मानाचे नंदीध्वज असतात. हे नंदीध्वज सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना प्रदक्षिणा घालतात. हे नंदीध्वज घेऊन नंदीध्वजधारक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यासाठी सराव करावा लागतो. त्या सरावास आज रात्री प्रारंभ झाला. सुरवातीस यात्रेतील पहिल्या मानाच्या नंदीध्वजाची पूजा पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, महेश हब्बू, सोमनाथ मेंगाणे, सुधीर थोबडे, योगीनाथ कुर्ले, राजा वाले, महेश अंदेली, प्रभुलिंग सोन्ना, सुहास दर्गोपाटील, आसीम सिंदगी, राजशेखर अमणगी, तम्मा कल्याणशेट्टी, बाळासाहेब भोगडे यांच्यासह भाविक उपस्थित होते. या पूजेचे पौरोहित्य शिवयोगी स्वामी होळीमठ, राजा स्वामी यांनी केले.  

 राजकीय संर्घषावर सोलापूरची तरुणाई काय म्हणतेय पहा (व्हीडीओ)

18 नंदीध्वज धारक करणार सराव 
यंदा नंदीध्वजाच्या सरावासाठी 18 नंदीध्वजधारक सराव करणार आहेत. हा सराव पहाटे सहा ते सकाळी आठपर्यंत करण्यात येणार आहे. रात्री नऊ ते 12 पर्यंत सराव करण्यात येणार आहे. 

बाबासाहेबांच्या "येथील' परिषदेकडे होते जगाचे लक्ष

 

राज्यात सिद्धेश्‍वर महाराजांचे भक्त 
महाराष्ट्र आणि कर्नाटकांच्या सीमेवरील सोलापूर शहर असल्याने या दोन्ही राज्यात सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांचे भक्त आहेत. जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेचे आम्ही चोख नियोजन करून ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन मदत करेल. 
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, सोलापूर 

यात्रेचे चांगले नियोजन 
रात्रीपासून नंदीध्वज सरावास सुरवात झाली आहे. या सरावात सहभागी होणाऱ्यांनाच यात्रेत नंदीध्वज धरता येणार आहे. त्याचबरोबर यात्रा गेल्या वर्षीपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पडेल याचे नियोजन करणार आहे. 
- राजशेखर हिरेहब्बू, यात्रेतील प्रमुख मानकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ..That is, the Nandidhwaj practice