राष्ट्रवादी 'येथे' गुंडाळला महाआघाडीचा फॉर्म्युला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, सत्यजित पाटणकर आदींच्या बैठकीत सभापतींचा निर्णय झाला. या वेळी पाटणकर गटाला डावलेले गेल्याने विक्रमसिंह पाटणकर नाराज होऊन बैठकीतून निघून गेले.

सातारा : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी नुकत्याच बिनविरोध झाल्या. मानसिंगराव जगदाळे यांना शिक्षण व अर्थ, मंगेश धुमाळ यांना कृषी व पशुसंवर्धन, सोनाली पोळ यांना महिला व बालकल्याण, कल्पना खाडे यांना समाजकल्याण सभापतिपदी राष्ट्रवादीने संधी दिली. सत्ताधारी राष्ट्रवादीने राज्यातील महाआघाडीचा फॉर्म्युला जिल्हा परिषदेत आजमावला नाही.
 
पीठासन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखेडकर यांनी निवडीचे कामकाज पाहिले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. "समाजकल्याण'साठी राष्ट्रवादीतून कल्पना खाडे, कॉंग्रेसमधून मंगल गलांडे यांनी, "महिला व बालकल्याण'साठी राष्ट्रवादीतून सोनाली पोळ, शिवसेनेतून सुग्रा खोंदू यांनी, तर इतर दोन समित्यांसाठी राष्ट्रवादीतून मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ व पाटण विकास आघाडीतून विजय पवार, कॉंग्रेसमधून शंकर खबाले यांनी अर्ज दाखल केले होते.

वाचा : राजे ठाकरेंच्या भेटीची चर्चा

राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला येथे राबविला जावा, अशी मागणी विरोधकांची होती. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादीने ती जुमानली नाही. त्यामुळे विरोधकांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर ही निवड बिनविरोध पार पडली. ""कॉंग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एक पद मिळावे, अशी इच्छा होती; पण पद देणे आपल्या हाती नाही. आघाडीच्या नेत्यांनी हा विचार करायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही,'' अशी खंत भीमराव पाटील यांनी व्यक्‍त केली.

हेही वाचा - Video महाबळेश्वर : लालचुटुक स्ट्रॉबेरी महागणार

निवडी बिनविरोध होण्यासाठी मन मोठे दाखवून अर्ज मागे घेतले. त्याबद्दल आभारी असल्याची भावना संजीवराजेंनी व्यक्‍त केली. आभार मानताना जगदाळे यांनी "मला पुढीलवेळी अध्यक्षपद देण्याचे कबूल केले होते. मात्र, या वेळी कबुलेंनाच अध्यक्ष केले,' अशी टिप्पणी करताच सभागृहात हशा पिकला.

हेही वाचा - बीएसएफचे जवान ज्ञानेश्वर जाधव यांना वीरमरण
 
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, सत्यजित पाटणकर आदींच्या बैठकीत सभापतींचा निर्णय झाला. या वेळी पाटणकर गटाला डावलेले गेल्याने विक्रमसिंह पाटणकर नाराज होऊन बैठकीतून निघून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress Party Members selected In Satara Zilla Parishad Committee