Vidhan Sabah 2019 : भाजपच्या नेत्यालाच राष्ट्रवादीची उमेदवारी

ज्ञानेश्‍वर बिजले 
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

जानकर हे मोहिते यांचे कट्टर विरोधक. हा मतदारसंघ 2009 पासून अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर, जानकर यांनी 2009 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. गेल्या निवडणुकीत त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जानकर यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा दिल्याने, त्यांना निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला. 

पुणे : माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर करीत तेथील नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात माळशिरस मतदारसंघ रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्याकडे दिल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. मोहिते पाटील यांच्या सल्ल्याने उमेदवार ठरविणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे. 

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; ही आहेत नावे

जानकर हे मोहिते यांचे कट्टर विरोधक. हा मतदारसंघ 2009 पासून अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर, जानकर यांनी 2009 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. गेल्या निवडणुकीत त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जानकर यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा दिल्याने, त्यांना निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Vidhan Sabha 2019 : बाळासाहेबांचे दर्शन घेऊन आदित्यने टाकले मातोश्रीबाहेर पाऊल

माळशिरस मतदारसंघातून मोहिते यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हनुमंत डोळस गेल्या दोन निवडणुकीत विजयी झाले. त्यांचे नुकतेच निधन झाले. मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, माळशिरस मतदारसंघातून त्यांच्या समर्थक उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. अशा वेळी उत्तम जानकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने माळशिरसची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP declares Uttamrao Jankar is contest election in Malshiras for Maharashtra Vidhan Sabha 2019