पालकमंत्रीपदाची चर्चा म्हणजे "बाजारात तुरी.......' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाते. जिल्ह्यात कॉंग्रेसचे आमदार जास्त असल्याने कॉंग्रेसलाच हे पद मिळेल, असे आमदार पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्याला आज ए. वाय. पाटील यांनी पत्रकातून प्रत्युत्तर दिले. 

कोल्हापूर - राज्यात नवे सरकार आले असले तरी अजून मंत्री मंडळाचा विस्तार नाही, कोणाला संधी मिळणार? हे स्पष्ट नाही. तोपर्यंत पालकमंत्रीपदाचा मुद्दा काढून विनाकारण गैरसमज पसरवण्यात काही अर्थ नाही. जे काही ठरवायचे ते श्रेष्ठी ठरवतील. यावर आताच चर्चा करणे म्हणजे "बाजारात तुरी अन्‌.' या म्हणीप्रमाणे परिस्थिती होईल, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता लगावला आहे. 

ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाते. जिल्ह्यात कॉंग्रेसचे आमदार जास्त असल्याने कॉंग्रेसलाच हे पद मिळेल, असे आमदार पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्याला आज ए. वाय. पाटील यांनी पत्रकातून प्रत्युत्तर दिले. 

15 वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कॉंग्रेसकडे

पत्रकात म्हटले आहे, 1999 मध्ये देशाचे नेते व आमचे दैवत शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. कॉंग्रेस पक्षाबरोबर तात्वीक मुदयावर फारकत घेवुन सुध्दा निवडणुकीनंतर पुरोगामी विचाराबरोबर राहत कॉंग्रेसबरोबर आघाडी केली, पाचवर्षे दोन्ही पक्षांनी चांगला कारभार केला. त्यावेळी सुध्दा जिल्हयात सर्वात जास्त राष्ट्रवादीचे पाच आमदार असताना पालकमंत्री म्हणून कै पतंगराव कदम यांच्याबरोबर सर्व आमदारांनी काम केले. 2004 साली राज्यात सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून येऊनही मुख्यमंत्रीपदावर काँग्रेस पक्षाला संधी देण्याचे मोठे मन राष्ट्रवादीने केले. 2009 साली सुध्दा एकत्र संसार केला व 15 वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कॉंग्रेसकडे राहिले व ते देण्याची दानत राष्ट्रवादीने दाखवली. 

हेही वाचा - बेधडक ! हातकणंगले तहसिलने घेतली २१ वहाने ताब्यात 

रामराज्याची आठवण येईल असा कारभार ठाकरेंनी करावा 

2014 मध्ये काँग्रेस पक्षाचा जिल्ह्यामध्ये एकही आमदार निवडूण आला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये युतीला बहुमत होते. परंतू; शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे वचन भाजपने पाळले नाही. त्या मुदयावरून युती तुटली व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चाणक्‍यनितीने महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये आली. आता दोन्ही कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी आहे की गल्या पाच वर्षामध्ये विरोधी पक्षामध्ये आपली पिछेहाट झालेली आहे. जनतेच्या अपेक्षांचा भग झालेला आहे. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, उद्योग व्यवसायवाले इत्यादी सर्व समाजाच्या घटकांना न्याय देणे, रामराज्याची आठवण येईल असा कारभार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करून पाच वर्षे आपल्यात मतभेद न करता सत्ता चालवणे, टिकवणे व महाराष्ट्र राज्य देशामध्ये एक नंबरचे बनवणे हे आपले सर्वच तिन्ही पक्षाच्या घटकाचे कर्तव्य आहे. विनाकारण मतभेदाचे मुद्दे न आणता जनतेच्या हिताचे काम करावे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा व इच्छा आहे, असे शेवटी पत्रकात म्हटले आहे. 

हेही वाचा - तानाजी चित्रपटामुळे ही साडी चर्चेत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Distinct President A. Y. Patil Criticism On MLA Satej Patil