सांगली - किंदरवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा झेंडा; रोहित पाटलांची एकहाती सत्ता

या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.
ncp leader rohit patil win kidarvadi gram panchayat election sangli
ncp leader rohit patil win kidarvadi gram panchayat election sangli

सांगली जिल्ह्यातील किदरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने एक हाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांच्या पॅनलच्या सातही उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. दरम्यान, सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. (ncp leader rohit patil win kidarvadi gram panchayat election sangli)

ncp leader rohit patil win kidarvadi gram panchayat election sangli
पुढील २४ तासांत राज्यातील 'या' भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता - IMD

सांगलीच्या कवठेमहांकाळ नगरपरिषद जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित आर. आर. पाटील (rohit patil) यांनी भाजपच्या खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह पहायला मिळत आहे. दरम्यान, किदरवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीच्या रोहित पाटील यांच्या पॅनलंनं विजय मिळवला आहे.

सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची आज मतमोजणी शांततेत पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पाटील यांचे पॅनल विरुद्ध भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होती. या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणास लागली होती. यात रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवले आहे.

ncp leader rohit patil win kidarvadi gram panchayat election sangli
Tea With Biscuits : चहासोबत बिस्किट खाताय?, पाहा कोणते आहेत 'तोटे'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com