राम मंदिराबद्दल शरद पवार नेमकं काय म्हणाले?

मिलिंद संगई
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

शरद पवार म्हणाले, ‘सरकारला विचारलं मंदिचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो आहे. ते सांगतात पुलवामा. ही परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी काय केल पाहिजे? ते सांगतील कलम 370.'

बारामती शहर : येत्या 6 नोव्हेंबर रोजी रामजन्मभूमीबाबत न्यायालयाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मंदी, बेरोजगारी व इतर मुद्यांवरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा सरकार विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. या मुद्याचाही त्यासाठी उपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलून दाखविली. बारामतीत आयोजित व्यापारी मेळाव्यात पवार बोलत होते.

राष्ट्रवादीला पंक्चर गाडी म्हणणाऱ्यांना, खासदार कोल्हे यांचे जबरदस्त उत्तर 

‘दोन्ही पक्षांनी मार्ग काढावा’
पवार म्हणाले, ‘बाजूने निकाल लागला तर सर्वच हिंदू लोकांना आनंद होईल, अशा वेळेस सरकार म्हणून असा निर्णय जर लागला तर, सरकारने मशीद उभारण्यासाठी जवळ वेगळी जागा उपलब्ध करुन द्यायला हवी, या मुळे मुस्लिम धर्मियांचेही समाधान होईल, त्या मुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार सामंजस्याने याच्यात दोन्ही पक्षांनी मार्ग काढावा, या मुळे हा प्रश्न सोडविल्याचे समाधान देशवासियांनाही मिळेल.’ 

विरोध होऊनही चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये वाटल्या साड्या (व्हिडिओ)

शिवसेनेचे संख्याबळ वाढले; पाहा आणखी कोणी दिला पाठिंबा

‘फक्त 370च सांगितले जाते’
पवार म्हणाले, ‘सरकारला विचारलं मंदिचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो आहे. ते सांगतात पुलवामा. ही परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी काय केल पाहिजे? ते सांगतील कलम 370. गुंतवणूक कमी का? ते म्हणतात कलम 370. उत्पादन कमी का? ते म्हणतात कलम 370. व्यापारावर परिणाम का झाला? 370. कायदा सुव्यवस्था का बिघडली? 370. या कलमाबाबत निर्णय घेतला ही गोष्ट योग्य आहे. पण, यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल किंवा त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल हे खर नाही. मंदिच्या संकटाची चाहूल लागू नये, यासाठी लोकांचे लक्ष अन्य बाबींकडे वळविण्याचा सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मंदी दूर केव्हा होणार, अर्थव्यवस्था सुधारणार केव्हा, लोकांच्या नोक-या जाण्याचं प्रमाण केव्हा थांबणार या बाबत काहीही विचारले की ते कलम 370 सांगतात हे योग्य नाही.’ महत्त्वाच्या मुद्यांवरून लोकांचे प्रश्न इतर ठिकाणी वेधण्याचा सरकारचा प्रयत्न अर्थव्यवस्थेला घातक असल्याचा इशाराही पवार यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp president sharad pawar statement about ram mandir baramati