Diwali Festival : तयार फराळाचा आलाय ट्रेंड (व्हिडिओ)

new trends in market for diwali sweets
new trends in market for diwali sweets

कोल्हापूर : धावपळीच्या युगात सर्व काही तयार खरेदीचा कल आता खाद्यपदार्थामध्येही वाढला आहे. वर्षातील सर्वात मोठ्या दिवाळी सणालाही आता बाजारात तयार मिळणाऱ्या फराळ आकडेच ग्राहकांचा अधिक कल आहे. यातून लाखो रुपयांच्या उलाढाली बरोबरच अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सध्या बाजारात तयार फराळाचा ट्रेंड खूप वाढला आहे. दिवाळी म्हटलं की फराळाचा मनमुराद आनंद लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी अशा मेजवानीचा आनंदच असतो. पूर्वी दिवाळी सण जवळ आला की प्रत्येक घरांमध्ये फराळ तयार करण्याची लगबग सुरू होत होती. मात्र, आता सध्या बाजारात तयार फराळाचा ट्रेंड वाढला आहे.

कोल्हापूरमध्ये खूप वर्षापूर्वी तयार फराळ करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी मात्र अनेकांनी याला विरोध केला. घरचा फराळ तो घरचा फराळाच असे त्यावेळी म्हणायचे. अनेकांनी तयार फराळाला नापसंती दर्शवली होती. घरी आजी, आई बनवेल तेच फराळ अतिउत्तम आणि रुचकर आहेत, अशी सगळ्यांची धारणा होती. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्या कारणाने अनेक महिला एकत्र फराळ करत असत. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धती शिवाय अनेक महिला मोठ्या पदावर काम करतात. त्यामुळे घरी राहून फराळ करणे अनेक महिलांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक महिलांना तयार फराळ खूप मोठा आधार बनला आहे.


आज कोल्हापूरमध्ये अनेक महिला घरगुती फराळ करून विक्रीसाठी ठेवतात. केवळ फराळ हा विक्रीसाठी नसून अनेक महिलांना यातून रोजगार मिळाला आहे. कोल्हापुरातील अंजली जोशी यांनी पंधरा वर्षापूर्वी फराळ तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात मागणी होती. हळू चार महिला हाती घेऊन अंजली जोशी यांनी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू केला.

सुरुवातीला स्वतःच्या खानावळमध्ये जेवण बनवून आणि त्यांना जेवणाचा आस्वाद दिला. त्यातच गोडधोड म्हणून चकली, चिवडा, करंजी, चिरोटे, बेसन लाडू, बुंदी लाडू, रवा लाडू, मसाला पुरी, पुराची वडी अशा खाण्यासाठी ठेवण्यात आल्या. यातूनच अनेकांनी तयार फराळाची फर्माईश केली. अगदी सुरुवातीला काही रुपयात चालणारा हा व्यवसाय आज लाखाच्या घरात टर्न-ओव्हर करत आहे.

केवळ स्वतःपुरते काम न ठेवता आज काही महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या दिवाळीला हातभार लावण्याचे काम अंजली यांनी केले आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी शिक्षण ,प्रशिक्षण गरजेचे आहे असे नाही तर कोणतीही कला अवगत असेल तर चांगल्या पद्धतीचे व्यवसाय करता येतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

गेली 15 वर्ष मी या ठिकाणी तयार फराळ करण्यासाठी येत आहे. या दिवाळीच्या सणामध्ये माझ्या घरची दिवाळी साजरी करण्यासाठी मला या सणाचा उपयोग झाला आहे.- अंजली जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com